Friday, January 23, 2015

५ . आसेतु हिमाचल अखंड भारत शोभत राहो ऐक्याने

५ . आसेतु हिमाचल अखंड भारत शोभत राहो ऐक्याने

आसेतु हिमाचल अखंड भारत शोभत राहो ऐक्याने 
मिळो प्रेरणा अखिल जगाला दिव्य विवेक विचाराने ॥ १ ॥

द्वेषभावना कुठेही नसो, धर्म पंथ हे विविध जरी 
ध्वज डौलाने फडकत राहो, समरसतेच्या रथावरी 
हस्तमलांची गुंफू माला बंधुत्वाच्या धाग्याने ॥ १ ॥ 

निरक्षरांसी सुज्ञ कराया, ज्ञानामृत ते देऊ चला 
निस्पृहतेने कार्य करोनी, सबल करु अवघ्या अबला 
धन्य करूया जीवन अपुले दीन जनांच्या सेवेने ॥ २ ॥ 

रामप्रभूचे श्रीकृष्णाचे चरित्र पावन मनी धरू 
शिवराया अन प्रतापराणा वंदन त्यांसी सदा करू 
हिंदुभूमिला समर्थ करण्या उभे राहूया शौर्याने ॥ ३ ॥                      

No comments:

Post a Comment