Sunday, December 17, 2023

१७९ महामंत्र हा नवविजयाचा, नव्या युगाचा नव पर्वाचा

 १७९  महामंत्र हा नवविजयाचा, नव्या युगाचा नव पर्वाचा


महामंत्र हा नवविजयाचा, नव्या युगाचा नव पर्वाचा

दाही दिशातुनी घुमते नाम, रामप्रभूचे सुंदर नाम ।

जय श्रीराम जय श्रीराम ॥धृ०॥


नवे पर्व हे हिंदुत्वाचे, संघशक्तिचे शिवशक्तीचे 

हिंदुमनांचा स्वामी राम, गंगेसम हे पवित्र नाम ।

जय श्रीराम जय श्रीराम ॥१॥


धर्म राखुया इथे निरंतर, खलप्रवृत्ती नुरो धरेवर

पुरुषार्थाचे मंगलधाम, रामप्रभूचे सुंदर नाम ।

जय श्रीराम जय श्रीराम ॥२॥


जीर्ण जातसे जेव्हा जळुनी, नवे येतसे सहज उजळुनी

छत्रपतींच्या स्वप्नांतले, हिंदूंचे हे सुवर्णयुग ये,

मुखी घेऊनी पवित्र नाम, जय श्रीराम जय श्रीराम ॥३॥


मंदिर बांधले जन्मभूमीवर, पराक्रमाने विशाल सुंदर

नवविजयाचा मार्ग दाखविल, जनशक्तीचा मंत्र महान ।

जय श्रीराम जय श्रीराम ॥४॥


लोकशाहीचा आद्य प्रणेता, सुजनशक्तिचा भाग्यविधाता

हिंदू युगाचा नायक राम, हिंदूंचा हा पंचप्राण ।

जय श्रीराम जय श्रीराम ॥५॥

No comments:

Post a Comment