Monday, October 21, 2019

२० . अमुचे जग गाईल जयगान

२० .  अमुचे जग गाईल जयगान ||धृ०||

अमुच्या मंगल देशासाठी, अम्ही उजळल्या जीवनज्योती 
शांतपणाने इथे चालले, अखंड जीवनदान ||१||

ओठावर या अनेक भाषा, नयनापुढती एकच आशा 
एकदिलाने सदैव नांदू, सोडूनी हे अभिमान ||२||

हृदयांतिल ते स्वप्न मनोहर, अवलोकाया होऊनि आतुर 
पत्थर काटे तुडवीत आलो, तिमिरातून भयाण ||३||

स्मरण कुणाला भूकतृषेचे, भानही कुठले भंवतालीचे 
हासत अपुल्या हवनांतुन हे, उभवू राष्ट्र महान ||४||

आज जगी या म्हणती वेडे, गातिल सगळे उद्या पवाडे, 
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण ||५||











No comments:

Post a Comment