Monday, October 21, 2019

२६ . गुढी उभारून हिंदुत्वाचा सूर्य नभी उगवला

२६ .  पूर्वदिशा उजळली रक्तिमा क्षितिजावर चढला

 पूर्वदिशा उजळली रक्तिमा क्षितिजावर चढला
 गुढी उभारून हिंदुत्वाचा सूर्य नभी उगवला  ।।धृ ०।।

सहस्र वर्षे इथे पसरली घोर काळरात्र
उपभोगातच रमला मानव उरे पशू मात्र
गंगेकाठी भूपाळीचा पुन्हा सूर लागला  ।।१।।

अर्थ प्रभावी काम प्रभावी तत्वज्ञाने हरली
सुखशांतीच्या शोधामध्ये अवनीवर भटकली
  भरत भूमीतच मिळेल त्यांना अंती जीवन कला ।।२।।

विज्ञानाच्या झंकारातुन घडते शिवतांडव
राम जागता गीता गाता घडेल नव मानव
मानवतेच्या कल्याणास्तव महायज्ञ चालला ।।३।।

भरतभूमिचे  पुत्र जागता घडते नवमन्वंतर
मांगल्याच्या वर्षावाने चिंब धरा अंबर
केशवरूपे सत्शक्तीचा शुभसंकल्प उदेला ।।४।।

No comments:

Post a Comment