१६ . एक दे वरदान आई एक हे वरदान दे
एक दे वरदान आई एक हे वरदान दे
संभ्रमी पार्थास या गीतेपरी तू जाण दे ।।धृ।।
एक दे वरदान आई एक हे वरदान दे
संभ्रमी पार्थास या गीतेपरी तू जाण दे ।।धृ।।
तू जगाची जन्मदा तू वीरप्रसवा माउली
तू अनादी थोरवी तव देवतांनी गाइली
आज आम्हा हिंदू मी हे सांगण्या अभिमान दे ।।१।।
विस्मृतीने लोपलेल्या अस्मितेला जाग दे
प्रलयकारी भैरवाचा क्रोध दे रणराग दे
अंतरी वेदांतले ते पुण्यपावन ज्ञान दे ।।२।।
हिंदू हिंदू एक अवघा भावना ही जागवी
देशभक्तीची चिरंतन ज्योत हृदयी चेतवी
नित्य अधरी आमुच्या तव कीर्तीचे यशगान दे ।।३।।
दाटता नैराश्यतम तू स्फूर्तीचा आलोक दे
विसरता पथ साधनेचा जागृतीची हाक दे
संकटांचा पथ दे पण पार करण्या त्राण दे ।।४।।
तव पुरातन वैभवाचे स्वप्न नित या लोचनी
केशवाने दाविलेले ध्येय अमुच्या जीवनी
पूर्ण व्हाया ते करी या राघवाचा बाण दे ।।५।।