१५. सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे
सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे
हिंदू असतील भाग्यविधाते आगामी शतशतकांचे ॥ध्रु॥
सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे
हिंदू असतील भाग्यविधाते आगामी शतशतकांचे ॥ध्रु॥
बंधुत्वाच्या व्रतास नाही अंशमात्रही खंड इथे
समाजपुरुषाच्या चरणाशी वंदू आम्ही एकमते
सतत चालणे आहे आता नाव नसे विश्रामाचे ॥१॥
समरसतेने सुसंघटित हा समाज घडवूया सारा
सुखसमृद्धी अन प्रगतीचा नभात उभवुया तारा
भेदभाव गाडुनी करूया उच्चाटन विषवल्लीचे ॥२॥
दरिद्रनारायण हा आहे सर्वजणांचा भगवंत
सेवाभावाच्या आधारे बनवू भारत बलवंत
वंचित कुणीना राहो येथे यास्तव जीवन जगायचे ॥३॥
No comments:
Post a Comment