१४. हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना
हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना एकतेची भावना ॥ध्रु॥
हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना एकतेची भावना ॥ध्रु॥
हिंदी मराठी द्राविडी वा काश्मिरी वा गुर्जरी
भिन्न भिन्न विराजती भाषा जरी जिव्हेवरी
परि अंतरी सुरभारती ती पूज्य सर्वा आपणा ॥१॥
श्रीकृष्ण बुद्ध जिनेन्द्र नानक बसव नायन्मार ते
चैतन्य शंकरदेव ज्यांचे संप्रदाय विभिन्न ते
परि पुण्यशील चरित्र त्यांचे पूज्य सर्वा आपणा ॥२॥
सधन कोणी अधन वा अल्पज्ञ कुणि सर्वज्ञ ते
प्रखर भगवद्भक्त आणि नितान्त नास्तिकवर्य ते
परि राष्ट्रसेवानिष्ठ जे जे वन्द्य ते ते आपणा ॥३॥
नामरूपे कोटि कोटि एक आत्मा सर्वभूती
वेद गीता सकल ऋषि मुनि मंत्र एकचि गर्जताती
मनन संतत करुनि त्याचे शुद्ध करु या जीवना ॥४॥
भेद तितुके स्वार्थमूलक पापकारक तापदायक
द्वेषवर्धक शक्तिनाशक ऐक्यबाधक राष्ट्रघातक
एकात्म भारत व्हावया निःस्वार्थ करु या जीवना ॥५॥