Monday, August 21, 2017

२१ . युद्धभेरी गर्जती दुंदुभी निनादती.

 २१ . युद्धभेरी गर्जती दुंदुभी निनादती. 

युद्धभेरी गर्जती दुंदुभी निनादती
संगरार्थ शूरवीर चालले रणाप्रती ॥ध्रु॥

भारतीय अस्मिता नीतिधैर्य शांतता
शत्रु ठाकला पुढे दानवीय क्रूरता
मृत्युदंड त्याजला ध्येय एक संप्रती ॥१॥

कंठ कंठ छेदणे शत्रुसैन्य तोडणे
सार्वभौम भारता सार्वभौम राखणे
विजयस्वप्न भूमिचे पेशी पेशी वाहती ॥२॥

सर्व पंथ मिळवुनी एक सौख्य चालते
एकराष्ट्र भावना अंतरात नांदते
स्फूर्तिदायी चेतना अणुअणूत जागती ॥३॥

कुटिल नीति ठेवणे राष्ट्रकार्य जाहले
भीम पार्थ होउनी भारतीय ठाकले
विकसनार्थ भूमिच्या रुधिरपाट वाहती ॥४॥

Monday, February 13, 2017

१६ . एक दे वरदान आई एक हे वरदान दे

१६ . एक दे वरदान आई एक हे वरदान दे

एक दे वरदान आई एक हे वरदान दे
संभ्रमी पार्थास या गीतेपरी तू जाण दे ।।धृ।।

तू जगाची जन्मदा तू वीरप्रसवा माउली
तू अनादी थोरवी तव देवतांनी गाइली
आज आम्हा हिंदू मी हे सांगण्या अभिमान दे ।।१।।

विस्मृतीने लोपलेल्या अस्मितेला जाग दे
प्रलयकारी भैरवाचा क्रोध दे रणराग दे
अंतरी वेदांतले ते पुण्यपावन ज्ञान दे ।।२।।

हिंदू हिंदू एक अवघा भावना ही जागवी
देशभक्तीची चिरंतन ज्योत हृदयी चेतवी
नित्य अधरी आमुच्या तव कीर्तीचे यशगान दे ।।३।।

दाटता नैराश्यतम तू स्फूर्तीचा आलोक दे
विसरता पथ साधनेचा जागृतीची हाक दे
संकटांचा पथ दे पण पार करण्या त्राण दे ।।४।।

तव पुरातन वैभवाचे स्वप्न नित या लोचनी
केशवाने दाविलेले ध्येय अमुच्या जीवनी
पूर्ण व्हाया ते करी या राघवाचा बाण दे ।।५।।


१७. हम युवा है हम करे मुश्किलों से सामना

 १७. हम युवा है हम करे मुश्किलों से सामना

हम युवा है हम करे मुश्किलों से सामना
मातृभूमी हित जगे है हमारी कामना ॥धृ॥

संस्कृती पली यहाँ पुण्य भू जो प्यारी है
जननी वीरों की अनेकों की भरत भू हमारी है
ऐसा अब युवक कहाँ दिल मे ज़िसके राम ना ॥१॥

ये कदम हजारों अब रुक ना पायेंगे कभी
मंझीलों पे पहुंचकर ही विराम ले सभी
ध्येय पूर्ती पूर्व अब रुक ना पाये साधना ॥२॥

ज्ञान के प्रकाश की ले मशाल हाथ में
शील की पवित्रता है हमारे साथ में
एकता के स्वर उठे छुनेको ये आसमाँ ॥३॥

आँधीयों में स्वार्थ की त्याग दीप ना बुझे
मातृभू को प्राण दूँ याद है शपथ मुझे
मै कहाँ अकेला हूँ साथ है ये कारवां  ॥४॥

Monday, January 16, 2017

१४. हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना

१४. हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना

हिंदू हिंदूच्या मनी जागवू शुभ चेतना एकतेची भावना ॥ध्रु॥

हिंदी मराठी द्राविडी वा काश्मिरी वा गुर्जरी
भिन्न भिन्न विराजती भाषा जरी जिव्हेवरी
परि अंतरी सुरभारती ती पूज्य सर्वा आपणा ॥१॥

श्रीकृष्ण बुद्ध जिनेन्द्र नानक बसव नायन्मार ते
चैतन्य शंकरदेव ज्यांचे संप्रदाय विभिन्न ते
परि पुण्यशील चरित्र त्यांचे पूज्य सर्वा आपणा ॥२॥

सधन कोणी अधन वा अल्पज्ञ कुणि सर्वज्ञ ते
प्रखर भगवद्भक्त आणि नितान्त नास्तिकवर्य ते
परि राष्ट्रसेवानिष्ठ जे जे वन्द्य ते ते आपणा ॥३॥

नामरूपे कोटि कोटि एक आत्मा सर्वभूती
वेद गीता सकल ऋषि मुनि मंत्र एकचि गर्जताती
मनन संतत करुनि त्याचे शुद्ध करु या जीवना ॥४॥

भेद तितुके स्वार्थमूलक पापकारक तापदायक
द्वेषवर्धक शक्तिनाशक ऐक्यबाधक राष्ट्रघातक
एकात्म भारत व्हावया निःस्वार्थ करु या जीवना ॥५॥

१२. आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना

१२. आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना

आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना ||ध्रु||

सद्गुरुच्या संगे शिष्य बिघडला
शिष्य बिघडला सद्गुरुची झाला ||१||

परिसाच्या संगे लोह बिघडले
लोह बिघडले सुवर्णची झाले ||२||

सागराच्या संगे नदी बिघडली
नदी बिघडली सागरची झाली ||३||

संघाचिया संगे आम्ही बिघडलो
आम्ही बिघडलो संघरूप झालो ||४||

१३. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते

१३. मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते

मंत्र छोटा तंत्र सोपे परी यशस्वी ठरले ते
रीत साधी शिस्त बांधी कार्य व्यापक उभवी ते ।।धृ०।।

व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती जागृत करणे तयाप्रती 
मनात प्रीती हृदयी भक्ती संघटनेने ये शक्ती ॥१॥

असोत जाती नाती गोती नसे तयांची आम्हा क्षिती 
नकोच कीर्ती नको पावती सेवा करणे निस्वार्थी ॥२॥ 

हिंदू अवघा बंधू बंधू भारतभूचा पुत्र असे
वंदुनि माता गौरव गाता सार्थक त्याचे होते असे ॥३॥

युगायुगातुन इतिहासातून पराक्रमाची परंपरा
दरीदरीतून मैदानातून चिरस्फूर्तीचा इथे झरा

१५. सन्मानाने गातील सारे जि आमुच्या विजयाचे

१५. सन्मानाने गातील सारे  गीत आमुच्या विजयाचे

सन्मानाने गातील सारे गीत आमुच्या विजयाचे
हिंदू असतील भाग्यविधाते आगामी शतशतकांचे  ॥ध्रु॥

बंधुत्वाच्या व्रतास नाही अंशमात्रही खंड इथे
समाजपुरुषाच्या चरणाशी वंदू आम्ही एकमते
सतत चालणे आहे आता नाव नसे विश्रामाचे ॥१॥

समरसतेने सुसंघटित हा समाज घडवूया सारा
सुखसमृद्धी अन प्रगतीचा नभात उभवुया तारा
भेदभाव गाडुनी करूया उच्चाटन विषवल्लीचे ॥२॥

दरिद्रनारायण हा आहे सर्वजणांचा भगवंत
सेवाभावाच्या आधारे बनवू भारत बलवंत
वंचित कुणीना राहो येथे यास्तव जीवन जगायचे ॥३॥